Monday, 18 November 2013

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)

प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आता केवळ शिक्षण पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक नसून त्यासाठी उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे आवश्यक होणार आहे. केंद्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी वर्गासाठी शिक्षक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा सक्तीची केली आहे. कायद्यानुसार ही शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य असणे गरजेचे आहे. सदर परीक्षा नोव्हेंबर 2013 मध्ये घेण्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रस्तावित केले आहे. संबंधित शासन निर्णय व परीक्षेची माहिती www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

ही परीक्षा सर्व शाळा, खाजगी अनुदानित-विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळा यामध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांसाठी लागू राहणार आहे. परीक्षेसाठी इयत्ता 1 ली ते 5 वी साठी कनिष्ठ प्राथमिक व इयत्ता 6 वी ते 8 वी साठी उच्च प्राथमिक असे दोन गट करण्यात आले आहेत. 

या दोन गटातील शिक्षक पदासाठी प्रत्येकी एक प्रश्न पत्रिका राहणार असून त्याचे स्वरुप व काठीण्यपातळी अनुक्रमे ते 5 वी माध्यमिकसाठी व इयत्ता 6 वी ते 8 वी उच्च माध्यमिक अभ्यासक्रमावर आधारीत असेल. दिनांक 13 फेब्रुवारी 2013 च्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेली शैक्षणिक व व्यावसायीक अर्हताप्राप्त केलेले उमेदवार सदर परीक्षेला प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील.

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) – २०१३

पाठ्यक्रम (अभ्यासक्रम) 


पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)

१) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा सामावेश राहील.

या विषयासाठी अध्यापत शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत विहित सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

२) भाषा-१ व भाषा-२

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा १ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दू
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी


इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील.

३) गणित:-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

४ परीसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरीक शास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असतील. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास. नागरीक शास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ:-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-

१) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र:-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधरीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

(२)भाषा-१ तसेच (३)भाषा-२

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दू
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी


इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठक्रम लागू राहील.

४अ) गणित व विज्ञान विषय गट-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय गटातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठक्रम लागू राहील.

४ब) सामाजिक शास्त्रे विषय गट-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पन, आशय व अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचिलत प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६वी ते ८वी च्या अभ्यासक्रमावर मधील संबंधित विषयाचा
पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ:-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठक्रम

प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके

प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

टीचर्स एलिजिबीलिटी टेस्ट 'टेट'साठी संगणक व माहिती तंत्रज्ञान







महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) – २०१३ (2013 - 14) परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयाच्या संपूर्ण अध्ययनासाठी आम्ही मार्गदर्शक पुस्तक बाजारात उपलब्ध केले आहे. हे पुस्तक १७ प्रकरणात विभागले असून यामध्ये प्रचिलत प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६वी ते ८वी च्या अभ्यासक्रमावर मधील दिलेला संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ठ करण्यात आला आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील संपूर्ण पुस्तक विक्रेत्यांकडे १७० रुपयांना उपलब्ध आहे. 




पुस्तकाच्या इंटरनेट किवा online खरेदीसाठी खाली दिलेल्या संकेत स्थळाचा वापर करावा.

http://www.bookganga.com/eBooks/Book/5412144563611921973.htm?Book=Sanganak-Va-Mahiti-Tantradnyan 

एकूण २९६ पाने असलेल्या या पुस्तकात संगणकाची संपूर्ण माहिती समाविष्ठ करण्यात आली आहे, हे पुस्तक Success Publications LLP पुणे यांच्या मार्फत प्रकाशित करण्यात आले आहे.

संगणक व माहिती तंत्रज्ञान, लेखक-सीए. अभिजीत बोबडे

संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया .

१) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे .

२) अथकपणा :- आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही . 

३) स्वयंचलित :- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो .

४) तार्किक व अमृत प्रक्रिया :- गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शकतो . कोणत्याही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडवण्यासाठी संगणकाचा फायदा होतो .

थोडक्यात एवढेच संगणकाची माहिती हाताळण्याचि तसेच सग्रहाची , वितार्न्याची क्षमता अफाट आहे . म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात संगणक काळाची गरज बनला आहे .

आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो .
1) गणिती सूत्र किती ही अवघड असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो त्याच त्याच प्रकारच्या गणन करण्यात संगणक तरबेज आहे .
२) संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करुण ठेवता येते , या संग्रहित करुण ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच सगणक आपल्या समोर ठेवतो .
३) संगणकाचा उपयोग करुण आलेख , आकृत्या , आलेख तसेच रंगीत चित्र सुलभ पणे काढता येतात .
४) कोणत्या ही क्लिष्ट सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या कोनातून कसे दिसेल हे संगणकाच्या मदतीने पाहु शकतो .
5) उद्योग धंदे , व्यापार , बैंक , कॉल सेंटर , शेअर मार्केट, हॉस्पिटल , शाळा महाविद्यालय , टिकिट रिसर्वेशन , अन्य खुप क्षेत्रात उपयोग होतो .
६) भौतिक , गुंतागुंतीच्या शास्त्रात , सैन्यदलाच्या तिन्ही दलात बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे .
७) रोगाचे निदान लावण्यासाठि प्रतेक्ष शास्त्र्क्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते .
८) इंजिनियरला घराचे , इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो पुर्व् नकाशा बनवु शकतो .
९) जन्म कुंडली बघणे तसेच अन्य कामासाठी संगणकाचा उपयोग केला जातो .