Monday, 18 November 2013

टीचर्स एलिजिबीलिटी टेस्ट 'टेट'साठी संगणक व माहिती तंत्रज्ञान







महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) – २०१३ (2013 - 14) परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयाच्या संपूर्ण अध्ययनासाठी आम्ही मार्गदर्शक पुस्तक बाजारात उपलब्ध केले आहे. हे पुस्तक १७ प्रकरणात विभागले असून यामध्ये प्रचिलत प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६वी ते ८वी च्या अभ्यासक्रमावर मधील दिलेला संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ठ करण्यात आला आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील संपूर्ण पुस्तक विक्रेत्यांकडे १७० रुपयांना उपलब्ध आहे. 




पुस्तकाच्या इंटरनेट किवा online खरेदीसाठी खाली दिलेल्या संकेत स्थळाचा वापर करावा.

http://www.bookganga.com/eBooks/Book/5412144563611921973.htm?Book=Sanganak-Va-Mahiti-Tantradnyan 

एकूण २९६ पाने असलेल्या या पुस्तकात संगणकाची संपूर्ण माहिती समाविष्ठ करण्यात आली आहे, हे पुस्तक Success Publications LLP पुणे यांच्या मार्फत प्रकाशित करण्यात आले आहे.

संगणक व माहिती तंत्रज्ञान, लेखक-सीए. अभिजीत बोबडे

संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया .

१) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे .

२) अथकपणा :- आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही . 

३) स्वयंचलित :- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो .

४) तार्किक व अमृत प्रक्रिया :- गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शकतो . कोणत्याही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडवण्यासाठी संगणकाचा फायदा होतो .

थोडक्यात एवढेच संगणकाची माहिती हाताळण्याचि तसेच सग्रहाची , वितार्न्याची क्षमता अफाट आहे . म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात संगणक काळाची गरज बनला आहे .

आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो .
1) गणिती सूत्र किती ही अवघड असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो त्याच त्याच प्रकारच्या गणन करण्यात संगणक तरबेज आहे .
२) संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करुण ठेवता येते , या संग्रहित करुण ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच सगणक आपल्या समोर ठेवतो .
३) संगणकाचा उपयोग करुण आलेख , आकृत्या , आलेख तसेच रंगीत चित्र सुलभ पणे काढता येतात .
४) कोणत्या ही क्लिष्ट सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या कोनातून कसे दिसेल हे संगणकाच्या मदतीने पाहु शकतो .
5) उद्योग धंदे , व्यापार , बैंक , कॉल सेंटर , शेअर मार्केट, हॉस्पिटल , शाळा महाविद्यालय , टिकिट रिसर्वेशन , अन्य खुप क्षेत्रात उपयोग होतो .
६) भौतिक , गुंतागुंतीच्या शास्त्रात , सैन्यदलाच्या तिन्ही दलात बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे .
७) रोगाचे निदान लावण्यासाठि प्रतेक्ष शास्त्र्क्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते .
८) इंजिनियरला घराचे , इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो पुर्व् नकाशा बनवु शकतो .
९) जन्म कुंडली बघणे तसेच अन्य कामासाठी संगणकाचा उपयोग केला जातो .


No comments:

Post a Comment